सोयाबीन कापूस उत्पादक अर्थ सहाय्य अर्ज नोंदणी अभियान डांगर बु: येथे संपन्न…

0

कृषिविभाग व डांगर ग्रामपंचायतीचा उपक्रम…

अमळनेर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी पर्यवेक्षक, अमळनेर मंडळ व ग्रामपंचायत कार्यालय, डांगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन कापूस उत्पादक अर्थ सहाय्य अर्ज नोंदणी अभियान, हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे
लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मयादेत प्रती हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक
शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या
क्षेत्रानुसार प्रती हेक्टरी रु.5,000 (2 हेक्टरच्या मयादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मित्रमंडळाच्या दि. 11 जूलै 2024 च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. या शासननिर्णयास मुर्त स्वरूप देण्यासाठी शेतकरी हितार्थ लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ, ग्रामपंचायत डांगर यांच्या पुढाकारातून व तालुका कृषी अधिकारी, अमळनेर, ग्रामविकास अधिकारी, व तलाठी कार्यालय यांचे सहकार्य लाभलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक अर्थ सहाय्य अर्ज नोंदणी अभियानास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ३७६ अर्ज प्राप्त झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या अर्जासंबंधी अडचणींचे निरसन करण्यात आले. प्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ, उपसरपंच राकेश वाघ व सर्व सदस्य , ग्रामविकास अधिकारी पाटील, तलाठी मधुकर पाटील , कृषीसेवक रोहिदास भामरे, व ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!