भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम व भव्य मिरवणूक…

0

 

अमळनेर : जगाला वस्त्र निर्मिती करणारे व साळी समाजाचे आद्य पुरुष वेदमूर्ती श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव श्रावण शु त्रयोदशि दि – 17/08/2024 वार – शनिवार रोजी सालाबादाप्रमाणे साळी समाजा मार्फत विविध कार्यक्रम आयोजित करून सकाळी 6 वाजता जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा व अभिषेक व सत्य नारायणा महापूजा करण्याचे योजिले आहे. महिलां मंडळ आणि विद्यार्थीसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच दुपारी 3 वाजता जिव्हेश्वर मंदिर साळी वाडा झामी चौक येथून श्री भगवान जिव्हेश्वर याची मूर्ती पालखीत विराजमान करून टाळ मुडुंग व बँड पथका सहत जय घोषत भव्य मिरवणुकीस सुरुवात होईल.

…आयोजकांनी दिलेली माहिती…

श्री भगवान जिव्हेश्वर महाराज याच्या विषयची माहिती फार प्राचीन काळात मानव निवस्त्र व लज्जा झाकण्यासाठी पाला पाचोडा अंगशी लावून वावरत असे एके दिवशी आदी शक्ती पार्वती मातेने श्री भगवान शंकरांना साकळ घातलं कि आपल्या सृष्टीतील मानव जातीला लज्जा झाकण्यासाठी वस्त्र निर्मिती साठी जिव्हे तुन श्री भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्म झाला व पार्वती मातेच्या सांगण्यावरून भगवान शंकर राणे मानव सृष्टी ला लज्जा झाकण्यासाठी साळी कुळात जन्म दिला व आज साळी समाजामुळे व श्री जिव्हेश्वर भगवान मुळे वस्त्र उद्योग व वस्त्र निर्मित करण्याच काम भगवान जिव्हेश्वर यांनी केले. भगवान जिव्हेश्वर है आदी माया पार्वती व भगवान शंकर याचे पुत्र म्हणून पृथ्वी तलावर प्रगतले असे म्हटले जाते.

या कार्यक्रमास समाज बांधव व भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्तितीत राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान  प्रताप छबुलाल साळी व दिलीप प्रभाकर मुंदनाकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!