भंगारचोरांवर कारवाई होण्यासाठी उपोषण ?
अमळनेर पाणीपुरवठा विभागाचे भंगार गेले आहे चोरीस…
अमळनेर : नगर परिषद – पाणी पुरवठा विभागाचे भंगार चोरी झाले असल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर कारवाई व्हावी यासाठी अमळनेर येथील परेश उदेवाल यांनी गुरुवार स्वतंत्र दिनापासून उपोषणास सुरुवात केली आहे. त्या उपोषणाचा आज दुसरा दिवस उगवला असून उपोषण सोडण्यासाठी ठोस असे कारण नगर परिषदेकडून आलेले नाही असे उदेवाल याचे म्हणणे आहे.
परेश उदेवाल याने उपोषणासाठी दिलेल्या पूर्वसूचनेत म्हटले आहे की, आपल्या नगरपरिषद पाणी पुरवठा विभागात मी गेल्या 6 महिन्यापासुन भंगार चोरी बाबत लेखी तक्रार करुनही पण मला आजपर्यंत कुठलेही लेखी स्वरुपाचे उत्तर मिळालेले नाही तसेच चोरीचे आरोप ज्या कर्मचाऱ्यावर आहेत तेच कर्मचारी अजुनही पाणी पुरवठा विभागात काम करीत आहेत तसेच चौकशी सुध्दा तेच करीत आहेत, याला कुठेतरी आळा बसावा म्हणून येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत मला कुठलेही लेखी स्वरुपाचे उत्तर मिळाले नाही म्हणून मी उपविभागीय कार्यालय अमळनेर यांच्या कार्यालयासमोर अन्न त्याग उपोषणास बसणार आहे, अशी पूर्वसूचना उदेवाल यांनी दिली होती. तेव्हा अमळनेर नगर परिषदेने उपोषणास बसू नये म्हणून पत्र उदेवाल यास दिले आहे. दरम्यान आज दुसरा दिवस उगवला असूनही भंगारचोरांवर कुठंहीही कारवाई झालेली दिसली नाही.