अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !
अमळनेर : ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा ऍड ललिता पाटील, संस्थेचे सचिव श्याम पाटील, देवेश्री पाटील, डी एड कॉलेजचे प्राचार्य महाजन, वाय सी एम चे सहाय्यक आशिष शर्मा तसेच शाळेचे प्राचार्य नीरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात प्राचार्य नीरज चव्हाण यांनी शालेय प्रास्ताविक व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच शाळेच्या संचालिका देवेश्री पराग पाटील यांनीसुद्धा स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगत मानोगत व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात ऍड ललिता पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विदयार्थ्यांना उदबोधनात्मक मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषनातून स्वातंत्र्य दिनाची माहिती दिली. तसेच बाल वाटीके पासून ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे, देशभक्तीपर गाणे, नाटक, नृत्य, कराटे प्रशिक्षन दाखवून उपस्थितांची मने जिंकली. शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कुमारी निकिता पाटील व सिध्दी मगरे या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. विलास पाटील व मुस्कान डिंगरे यांनी कार्यक्रमाची सुरुवात व आभारप्रदर्शन केले. कुमारी तेजस्वी चव्हान व श्रद्धा परदेशी यांनी गाण्यांचे योग्यरित्या नियोजन केले. सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.