बांगलादेशातील हिंदूंमुळे अमळनेरातील हिंदूंना त्रास का ?
अमळनेरच्या अनेक हिंदूंचे व्यवसाय ठप्प तर बाजारात आलेल्या अनेक लोकांना जावे लागले खाली हात

बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय झाला त्यासाठी इतर काही पाऊल न उचलता दुकाने, गाड्या व इतर आस्थापना बंद करून अमळनेर मधील हिंदूंनाच त्रास दिला जात असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
अमळनेर मधीलच नाही तर संपूर्ण भारतातील हिंदू गरीब आहेत. काही दिवसभर कमावतात तेव्हा संध्याकाळी आपल्या मुलाबाळांना खाऊ घालतात, अशीच परिस्थिती अनेकांची आहे. मात्र असे असतांना आपल्याला वरून आलेला हुकून ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना पाळायला भाग पडायला लावतात याला काय म्हणता येईल ?
हुल्लडबाजीने घाबरून अमळनेर बंद…
दिवस उगवला आणि कुणी दुकाने उघडून, हातगाड्या लावून जो – तो ज्याच्या – त्याच्या कामाला लागला. मात्र काही वेळानंतर आलेल्या जमावाने हुल्लडबाजी केली आणि दुकाने बंद करण्यास भाग पाडले, जेथे सुरू असले तेथे त्याला बरे वाईट बोलून दुकाने बंद करण्यास भाग पाडले गेले. हे कोणत्या प्रकारचे आंदोलन होते ?
पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका…
सकाळी अमळनेर शहरात जे काही घडले या दरम्यान शहरात पोलिसांच्या फेऱ्या सुरू होत्या. ज्यांनी हुल्लडबाजी केली त्यांना पोलिसांकडून काहीही बोलले गेले नाही. उलट पोलिसांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे.
हुल्लडबाजांवर कारवाई होईल का ?
अमळनेर शहरात हुल्लडबाजी करत दहशद माजवणाऱ्यांवर कारवाई होईल का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण आज जे झाले ते कुठल्याही गुंडगिरी पेक्षा कमी नाही.
प्रतिक्रिया….
मी एक छोटा व्यावसायिक आहे, माझी उद्या ऑर्डर आहे, सुमारे सात कपडे मला घ्यायचे होते मात्र बाजार बंद असल्याचे मला आता इथे आल्यावर समजले. मी गरीब माणूस असून दिवसभर काम करून संध्याकाळी परिवाराला खाऊ घालतो, आजच्या बंदमुळे माझे उद्या खूप मोठे नुकसान होणार आहे.
छोटा व्यावसायिक…. धर्माने हिंदू
मी दवाखान्यात आलो होतो, गोड्या – औषधी तर घेतल्या गेल्या मात्र आता भाजीपाला घेण्यासाठी इकडे आलो तर समजले की, आज बाजार बंद आहे. बांगलादेशातील घटनेमुळे आमच्यासारख्या हिंदूंना त्रास होणे चुकीचे आहे.
शेतकरी….धर्माने हिंदू
मी याच बाजारात काल 10 किलो गिलके विकले, ते 40 रुपये किलो दराने विकले गेले होते, मात्र ते आज परत घेऊन जावे लागत असून ते उद्या 25 रुपये किलो दराने सुद्धा विकले जाणार नाहीत.
शेतकरी…धर्माने हिंदू
अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आजच्या बंदमुळे नागरिकांच्या आहेत. ह्या सर्व प्रतिक्रिया दिव्य लोकतंत्रने रेकॉर्ड केलेल्या आहेत. प्रतिक्रिया देणारे सर्व हिंदूच आहेत. त्यांना त्रास झाला असता म्हणून नाव जाहीर करता आली नाहीत. आज ह्या सर्वांचा विचार करून हेच समजते की, आज हिंदूंमुळे हिंदूंनाच त्रास दिला गेला आहे….
एवढेच….!