ये आझादी झुटी है देश की जनता भुकी है !
तरवाडे येथील अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांचे व आठवले गटाचे पाण्यासह इतर मागण्यांसाठी स्वातंत्र्य दिनी उपोषण…
अमळनेर : ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है ! ही घोषणा भारत स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट १९४७ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिली होती. आज देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तरी ओलांडली मात्र देशातील असे कितीक लोक आहेत जी आज भुकेने व्याकुळ आहेत. काही गाव अशी आहेत जेथील काही वस्त्यांमध्ये नागरिकांना पाणी नाही, रस्ते, गटारी नाहीत, वीज नाही. मात्र आपल केंद्र आणि राज्य सरकार तळागाळातील लोकांकडे पाहत नाही. ४ लोकांमध्ये फिरणाऱ्या लोकांच्या अंगावर चांगले कपडे झाले, किंवा तो चांगला बोलायला लागला किंवा त्याला मोफत धान्य दिलं तेवढ्यातच त्याच सर्व काही नाही. त्याला पाणी, रस्ते, गटारी, लाईट यांसारख्या अनेक सुखसुविधा मिळाव्यात…. तेव्हाच हे सरकार खरे गरिबांचे सरकार म्हणता येईल…
अमळनेर तालुक्यातील तरवाडे गावातील काही अनुसूचित जाती जमातीतील लोकांना गावापासून काही अंतरावर घरकुल बांधण्यासाठी जागा देण्यात आली. हा विषय देखील सहन करण्याजोगे व्हावा… मात्र ती घरे दिली तर तेथे पाणी, रस्ते, गटारी ह्या देखील द्यायला हव्यात. सुमारे ७ वर्षांच्या आधी पासून या लोकांना गावाबाहेर सुमारे १ किलोमिटरच्या अंतरावर घरकुल देण्यात आले होते. मात्र सात वर्षांपेक्षा जास्त वेळ उलटूनही या लोकांना सुखसुविधा उपलब्ध नाहीत. अनेक वेळेस या लोकांनी मौखिक व लेखी मागण्या ग्रामपंचायतीकडे केल्या. मात्र कुणालाही यांच्यावर दया आली नाही. तर मागील काही महिन्यांपूर्वी पासून ते लोकं अमळनेर पंचायत समिती मध्ये देखील चकरा मारत होते. मात्र तेथे देखील त्यांचं कोणी ऐकेना… म्हणून या लोकांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचे हत्यार उपसले. आणि दिनांक १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी त्यांचे उपोषण झाले. त्या नंतर लेखी आश्वासनाने उपोषण स्थगित करण्यात आले आहे. या उपोषणास संबंधित गावातील त्रस्त नागरिक, आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.