अमळनेरात शॉक लागून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू…
बालक बालमजुरी करीत असल्याचा संशय
अमळनेर : बांधकाम मजुरीसाठी आलेल्या मजुराच्या मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना अमळनेर शहरातील डी. डी. नगर भागात घडली आहे. जगदीश डॉक्टर सैनानी असे मृत बालकाचे नाव आहे मात्र हा बालक बालमजुर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. व तो बांधकामाला पाणी मारत असतांना त्याला शॉक लागला असल्याचा संशय व्यक्त होत आहेबांधकाम मजुरीसाठी आलेल्या मजुराच्या मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना अमळनेर शहरातील डी. डी. नगर भागात घडली आहे. जगदीश डॉक्टर सैनानी असे मृत बालकाचे नाव आहे मात्र हा बालक बालमजुर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. व तो बांधकामाला पाणी मारत असतांना त्याला शॉक लागला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
जगदिशचे वडील डॉक्टर यांनी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे कि, ते सुमारे दोन महीन्यापासुन अमळनेर शहरातील डी. डी. नगर भागात बांधकाम मजुरी साठी परीवारासह आलेले होते. काल बुधवार रोजी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 09.00 वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील डी. डी. नगर भागात अभय गोयील यांच्या बांधकामाच्या ठिकाणी संडासाच्या टाकीवर पाणी मरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार बसविलेली असुन तिच्याने सर्व बांधकामास डॉक्टर पाणी मारत असतो. नेहमी प्रमाणे सकाळी बांधकामावर पाणी मारत असतांना त्यांचे दोन्ही मुलं धुलेराम व जगदीश हे खाली खेळत होते. दोन्ही मुले खेळत असतांना जगदीश वय 6 वर्षे हा पाण्याच्या टाकीजवळ गेला असता तेथे त्या इलेक्ट्रीक मोटार शॉक लागल्याने तो तेथेच बेशुध्द पडल्याने डॉक्टर लागलीच त्यांचे मालक रौफखान मेवाती, व मित्र तन्वीर शरीफ खान मेवाती, अजीम यासीन खान मेवाती यांना बोलावुन मुलगा जगदीश यास उचलुन ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे घेवुन गेले जगदीश यास डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले आहे.
वरील खबरीनुसार अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार चंद्रकांत पाटील हे करीत आहेत करीत आहेत.
दरम्यान संबंधित कुटुंबास मदत मिळावी यासाठी लहान मुलांच्या अडीअडचणींवर काम करणाऱ्या एक्सिस टु जस्टीस फॉर चिल्ड्रन्स या प्रकल्पाचे अमळनेर तालुका समन्वयक समाधान मैराळे व आधार संस्था, अमळनेर हे प्रयत्न करीत आहेत.