अमळनेरात सट्टा-मटक्याला ऊत…
अनेक सार्वजनिक ठिकाणे झाली साट्ट्यांचा बाजार; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज…

अमळनेर : शहरासह तालुक्यात सट्टा व मटक्याला सध्या ऊत आलेले आहे. अमळनेर शहराच्या गल्ली – बोळामध्ये व काही खेडे गावांमध्ये देखील सट्ट्यांची उपदुकाने सुरू आहेत. सट्टा मटका – खेळणे व खेळावणे दोन्ही गुन्हे आहेत. मात्र खेळणारे व खेळावणारे कोणत्याही गोष्टींना घाबरत नसल्याचे चित्र दिसून येते. यामुळे अनेक खेळणाऱ्यांना चुना लागत असून सट्टा खेळण्याची वाईट सवय लोकांना लागत आहे. म्हणून जनतेत याची जनजागृती होणे गरजेचे आहे. मात्र सट्ट्याच्या माध्यमातून शॉर्टकट पैसा मिळवण्याच्या आमिषाने लोकं खेळत असतात. सट्टे खेळणारे व खेळावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
जनतेची आर्थिक लूट…
कमी वेळात व शॉर्टकट मार्गाने पैसे कमावण्याचे अमिश दाखवून सट्टा चालक लोकांना गंडवत आहेत. आणि काही लोकांना सट्टा लागत असल्याने याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व यामुळे जनतेची मोठी आर्थिक लूट होत आहे.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज…
अमळनेर मध्ये सट्टा – मटका खेळणारे व खेळावणारे यांची संख्या वाढत असल्याने ही बाब गंभीर आहे. सट्टा चालक हे प्रशासनाला घाबरत नाही. याचेच उदाहरण म्हणजे सट्टा हा सर्रास पणे अमळनेर शहरातील सार्वजनिक ठिकाणी खेळवला जात आहे. यात अनेक ठिकाणे ही शासकीय मालमत्ता आहे. म्हणून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
सार्वजनिक ठिकाणे झाली सट्टा बाजार…
अमळनेर शहरातील नगर परिषदेची शौचालये, नगर परिषदेच्या मालकीचे अनेक कॉम्प्लेक्स, नगर परिषदेचा नवीन मच्छी व कोंबळी बाजार जवळील भाग आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असतो. या ठिकाणी गेल्यावर जणू यांचा एक वेगळा बाजारच अमळनेर शहरात सुरू झालाय असे भासू लागते.
