जळोद बस सुरू करण्यासाठी मनसेचे आगार प्रमुखांना निवेदन…

0

अमळनेर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्य परिवहन महामंडळाचे  अमळनेर आगार प्रमुखांना बुधवारी निवेदन देण्यात आले. अमळनेर – जळोद बस बंद झालेली आहे ती पुन्हा सुरू करावी व विद्यार्थ्यांना व वृद्ध लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून ‌ बस‌ पुन्हा सुरू करण्यात यावी. शाळेतील मुला – मुलींचे व वृद्ध लोकांची गैरसोय होते त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकत नाही. म्हणून आपण लवकरात – लवकर सकाळी 10.30 वाजेची अमळनेर ‌- जळोद बस लवकरात – लवकर सुरू करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल ही आपण नोंद घ्यावी असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  यावेळी तालुका अध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, तालुका उपाध्यक्ष दिनेश चौधरी, शहर उपाध्यक्ष करण पाटील, शहर सचिव संकेत पाटील, शहर उपाध्यक्ष गजानन गोसावी, आदित्य दोरकर, निलेश भावसार, विभाग अध्यक्ष बापू चौधरी आदी  मनसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!