अजित पवारांच्या दौऱ्या दरम्यान अमळनेरात बॅनर वॉर

ते पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाहीत… या वक्तव्याचे बॅनर…
अमळनेर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अमळनेरात येत असून त्या आधीच अमळनेर शहरात बॅनर वॉर पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. ते पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाहीत. शरद पवारांच्या या वक्तव्याचे हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर वॉर मुळे मतदार संघात व राजकीय पटलावर चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसापासून अमळनेर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
