नाविन्यपूर्ण संशोधन काळाची गरज- डॉ.विजय उपाध्ये यांचे प्रतिपादन
अमळनेर : येथिल सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी” नाविन्यपूर्ण संशोधन-काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पारुल युनिव्हर्सिटी , वडोदरा गुजरात येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डेप्यूटी डायरेक्टर डॉ.विजय जे. उपाध्ये यांच्या व्याख्यानाचे आयोजन दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजीदुपारी 1 वाजता सानेगुरुजी सभागृहात करण्यात आले होते. या प्रसंगी अतिथींचे स्वागत हे अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे यांनी केले. प्रा. वैशाली महाजन यांनी अतिथींचा परिचय करून दिला तर विभागप्रमुख प्रा. शशिकांत जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
प्रस्तुत व्याख्यानात डॉ. विजय उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना -संशोधन व संशोधनाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,नाविन्यपूर्ण संशोधन ही काळाची गरज आहे,त्यासाठी तरुणांनी अधिकाधिक संख्येने या क्षेत्रात यावे असे आवाहन केले.त्याचबरोबर ज्याप्रमाणे सामान्य संपत्तीचा लाभ माणसाला घेता येतो त्याचप्रमाणे बौध्दिक संपदेचा व मेहनतीचाही मोबदला मिळायला हवा .ही बौध्दिक संपदा अधिकार (IPR)सुरक्षित राहण्यासाठी काही अधिकार देण्यात आलेले आहेत त्याला बौध्दिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) असे म्हणतात या संबंधी बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी IPR च्या विविध प्रकारांवर त्यांनी प्रकाश टाकला उदा- पेटंट,ट्रेडमार्क,ट्रेड सीक्रेट, कॉपीराईट्स इत्यादी.
विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करुन संशोधन क्षेत्रात येण्यासाठी बहूमोल मार्गदर्शन केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी केले. याप्रसंगी विभागातील प्रा.नूतन बडगुजर,प्रा.आदित्य संकलेचा,प्रा.नेहा महाजन,प्रा.तेजस्विनी पाटील व सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.अरुण जैन,डॉ.धिरज वैष्णव,डॉ.मुकेश भोळे,कुलसचिव राकेश निळे,वरिष्ठ लिपिक भटू चौधरी,प्रयोगशाळा परिचर श्री. विलास पाटील व किशोर सोनार यांनी विशेष सहकार्य केले.