अजित पवारांच्या दौऱ्यात साहेबराव पाटलांचा वेळ राखीव…
साहेबराव पाटील उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन राजकिय आत्महत्या करणार की सहभागी न होऊन पुनर्जीवित होणार ?
अमळनेर : विधानसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगणार असून आचारसंहिता लागू होण्याच्या आधी एका व्यक्तीवर मतदार संघाचे लक्ष लागून आहे. आणि ती म्हणजे कृषिभूषण साहेबराव पाटील…. साहेबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांच्या काही दिवसांपूर्वी भेटी झाल्या आणि मतदार संघात चर्चांना उधाण आले.

मात्र नंतर कृषिभूषण पाटील व त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले की, साहेबराव पाटील व मंत्री अनिल पाटील यांच्या मनोमिलनाच्या बातम्या खोट्या असून ९ ऑगस्ट रोजी भूमिका स्पष्ट करू. मात्र ९ ऑगस्ट गेल्या नंतर आता १२ ऑगस्ट ही तारीख ठरवेल की साहेबराव पाटील उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन राजकीय आत्महत्या करतात की, सहभागी न होऊन पुनर्जीवित होतात…. कारण उद्याच्या अजित पवारांच्या उद्याच्या दौऱ्यात साहेबराव पाटील यांचा वेळ राखीव आहे. म्हणून उद्याच्या घडामोडीवर सर्वांचे लक्ष लागून आहे.
