अमळनेर :तालुक्यातील मांडळ वि.का.सो. वर चेअरमन पदी ललिता विलास सोनवणे तर व्हाईस चेअरमन पदी शालीग्राम नथ्थु बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बद्दल दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सादर निवडणूक वेळी सुभाष महादू पाटील, शेख फारूक हाजी अ. रज्जाक, सुंदराबाई धोंडू कोळी, देविदास पुना कोळी, रवीन्द्र रावण पाटील, नामदेव पोपट बडगुजर, इंदूबाई यशवंत पाटील , डिगंबर हिमतराव मराठे. सुरेश मंगा महाजन, सुरेश दगा धनगर, सोमनाथ नारायण खैरनार आदी सभासद हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले. यावेळी निवडून आलेल्या दोघांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मांडळ ग्रामपंचायत सरपंच मिनल कोळी, माजी सरपंच नथु भावराव सोनवणे विलास ओंकार सोनवणे से.नि.सहकार खाते, आडीट विभाग, हिरालाल लक्ष्मण सोनवणे, वसंत रावण सोनवणे माजी.चेअरमन, समाधान भास्कर सोनवणे माजी सरपंच. डॉ अशोक हिंमतराव पाटील संचालक कृ. उ. बाजार समिती अमळनेर, मनोहर किसन पाटील माजी सरपंच, शुभांगी सुरेश पाटील, पोलीस पाटील, सुरेश पाटिल, विजय नथू पाटील, दिपक काशीनाथ बडगुजर, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष राजू धनगर, रेतींबंदी कमेटी अध्यक्ष सुरेश लोटन कोळी, रावसाहेब पंडीत कोळी, सुनील धोंडू कोळी, गणेश शालिग्राम बडगुजर, शेखर यशवंत पाटील आदींनी नवनिर्वाचित, चेअरमन व व्हाईस चेरमन.यांना शुभेच्छा दिल्या. तर नथ्थु सोनवणे, वसंत सोनवणे समाधान सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.