राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेनिमित्त युवा संवाद व शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन
अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज 12 रोजी अमळनेरात येत असून त्यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालयात युवा संवाद व कलागुरु मंगल कार्यालयात शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी युवा संवाद व शेतकरी सन्मान संवाद कार्यक्रमात विद्यार्थी युवा व शेतकरी बांधवानी अवश्य उपस्थिती द्यावी असे आवाहन मंत्री अनिल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.