सोनखेडीत गुरे – ढोरे बांधून महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना…

0

ग्रामपंचायत नोटीस देण्यास घाबरते का ?

अमळनेर : तालुक्यातील सोनखेडी येथील एका महापुरुषाच्या स्मारकाला लागूनच गुरे ढोरे तसेच इतर जनावरे बांधून महापुरुषाचा अपमान केला जात आहे.

या बाबत मागील काही महिन्यांपूर्वी अमळनेर पोलिसात तक्रार देखील देण्यात आली होती. मात्र त्या नंतर काही दिवसांनी पुन्हा अशा प्रकारे त्याच जागेवर जनावरे बांधून तेथे घाण करून महापुरुषाच्या स्मारकाची विटंबना केली जात असून विरोध करणाऱ्यांवर उलट दादागिरी केली जात असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. जनावरे बांधणारा व्यक्ती दुसरा कुणी नसून त्याच समूहाचा आहे व तेथील ग्रामपंचायतीत पदाधिकारी देखील ती व्यक्ती राहिलेली आहे. म्हणून ग्रामपंचायत देखील त्यास नोटीस देण्यास घाबरते की काय असा सवाल उपस्थित होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!