टवाळखोर रोडरोमिओंवर बसणार खाखीचा वचक…
सुमारे ८ रोडरोमिओंवर अमळनेर पोलिसांची कारवाई…
अमळनेर : शहरात महाविद्यालयांच्या परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिला व मुलींची छेडखानी करण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीचा अमळनेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी गांभीर्य पूर्वक विचार करत शहरातील प्रताप महाविद्यालय व धनदाई महाविद्यालय परिसरात कारवाई करण्याचे नियोजन केले. प्रताप महाविद्यालय व धनदाई महाविद्यालय या दोन्ही महाविद्यालयाच्या परिसरात दोन वेगवेगळे पथके तयार करून पथकांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दोन्ही पथकांनी दोन्ही महाविद्यालयीन परिसरात एकूण ८ रोमियोंना हेरून त्यांच्याकडून महाविद्यालयीन ओळखपत्राची मागणी केली व परिसरात फिरण्याचा किंवा थांबण्याचा उद्देश विचारला परंतु त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने व उडवाउडविची उत्तर देत असल्याने परिसरात थांबण्याचे सबळ कारण नसल्याने वरील एकूण ८ मुलांना रोमिओगिरी करताना तसेच सार्वजनिक शांततेच्या भंग करून आरडा – ओरड करताना मिळून आल्याने त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करणारे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. –विकास देवरे – पोलीस निरीक्षक, अमळनेर
ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या सूचनाने पोहेका गणेश पाटील, पोहेका मिलिंद सोनार, पोहेका रवींद्र पाटील, पोना सिद्धांत सिसोदे, पोना मिलिंद बोरसे, पोका निलेश मोरे, पोना संजय बोरसे, पोका जितेंद्र निकुंभे, पोका अमोल पाटील, पोका विनोद संदानशिव, पोका गणेश पाटील, पोका विनोद पाटील यांच्या पथकाने केली.