लैगिक कामगार महिलांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर चर्चा सत्र संपन्न
विविध क्षेत्रातील सुमारे १0५ प्रतिनिधींनी घेतला सहभाग

अमळनेर : बुधवार 7 ऑगस्ट रोजी अमळनेर येथील हॉटेल मिड टाऊन येथे लैंगिक कामगार महिलांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर एक दिवशीय चर्चा सत्राचे आयोजन नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर (NNSW), संग्राम संस्था सांगली, स्वाधार महिला संघ, अमळनेर, आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर, आणि विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
सदर चर्चा सत्राचा मुख्य उद्देश १९ मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक कामगारांच्या अधिकारांच्या बाबतित निर्देश जारी केले आहेत. सर्व सेक्स वर्कर्सना संविधाना नुसार सन्मानाचे जीवन कसे जगता येईल या विषयी सुमीम कोर्ट पॅनलने न्यायालयाला तपशिलवार शिफारसी केल्या आहेत.
सदर चर्चासत्रास विधिसेवा प्राधिकरणाचे जळगाव जिल्हयातील वकील प्रतिनिधी, जळगाव जिल्हा व शहरातील पोलिस अधिकारी, सेक्स वर्कर सोबत कार्य करणाऱ्या विविध सामाजीक संस्थेचे प्रतिनिधि, महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी, लैंगिक कामगार प्रतिनिधी, जिल्हा एडस, नियंत्रण कार्यालयाचे प्रतिनिधी, मीडिया प्रतिनिधी सहभागी होते…
या चर्चा सत्रास प्रमुख पाहुणे म्हणुन विधि सेवा प्राधिकरण जळगाव, यांचे सचिव श्री सय्यद हे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड ललिता पाटील उपस्थित होत्या , उद्घाटन प्रसंगी प्रांत अधिकारी महादेव खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील नंदवाळकर व्हॉइस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, विप्रोचे एच आर मॅनेजर चेतन थोरात ऍड. शकील काझी, पोलीस निरीक्षक विकास देवरे, आधार संस्थेच्या डॉक्टर भारती पाटील, रेणू प्रसाद यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उद्घाटन सत्रात मान्यवरांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयांच्या आदेश पुस्तिकेची शिदोरी स्वरूपात टोपली उघडुन करण्यात आले. याप्रसंगी सेक्स वर्कर्स महिलांच्या समस्येवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आधार बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा उद्देश ,आधार आणि स्वाधार संघ यांचे सेक्स वर्कर महिलां साठीचे मागील 25 वर्षातील केलेल्या कामाची ओळख करून दिली. सांगली येथील संग्राम संस्थेच्या प्रकल्पाधिकारी श्रीमती किरण यांनी लैंगिक कामगार महिलांच्या समस्यांवर प्रकाश टाकला.
यानंतर प्रमुख मार्गदर्शक अँड ललिता पाटील यांनी सेक्स वर्कर महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सुप्रीम कोर्टाने दिलेले दिशा निर्देश, त्यावर आपण अजून काय सूचना देऊ शकतो यावर प्रकाश टाकला.
तसेच 19 मे रोजी सर्वाच्या – न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना या बाबतित सविस्तर मांडणी केली.
त्यानंतर पोलिस प्रतिनिधी म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी सेक्स वर्कर महिलांना होणाऱ्या पोलीस कार्यवाहीत यापुढे आम्ही या निर्देशांचे पालन करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली, अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे , जळगाव ट्रॅफिकिंग युनिटचे पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक , अमळनेर चोपडा आणि पारोळा येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थिती होती
श्री सय्यद (सचिव विधि सेवा प्राधिकरण जळगाव)
यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विधी सेवा मार्फत सुरु असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व सेक्स वर्कर महिलांच्या बाबतीत असलेल्या कायदयांची अंमलबजावणी करत असतांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे पालन कसे करावे, व महिलांनी जास्तीत जास्त प्रशिक्षण व माहिती घेऊन सक्षम व्हावे असे आवाहन केले. तसेच महिलांना काहीही कायदेविषयक मदत लागली तरी त्यांनी जिल्हा विधी प्राधिकरणाशी संपर्क साधावा असे आवाहन केले,
सदर चर्चा सत्रामध्ये सुमारे 105 प्रतीनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमात आलेल्या लैंगिक कामगार महिला यांच्या वतीने फरिदा काझी , संध्या ,सीमा यांनी त्यांच्या सोबत घडलेले प्रसंग सांगितले, तसेच यंत्रणे कडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यानंतर चर्चासत्र सर्वांना खुले केले गेले.
यामध्ये अमळनेर, चोपडा व पारोळा येथील वकील संघ प्रतिनिधींनी आपल्या भूमिका चर्चासत्रात सहभागी होऊन मांडल्या. ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील कौन्सिलर , माध्यम प्रतिनिधी
आदींनी चर्चासत्रात आपले मते व दृष्टिक्षेप टाकून सकारात्मक चर्चा घडवुन आणली .
सदर चर्चा सत्राला यशस्वी करण्याकरिता जळगाव जिल्हा विधी सेवा समितीचे सुभाष चंद्र पाटील, जावेद पटेल, आधार बहुउद्देशिय संस्था, स्वाधार महिला संघ, संग्राम संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
प्रा. विजय कुमार वाघमारे यांनी आधार संस्था राबवित असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती देऊन, भारतातील सेक्स वर्कर महिलांची सामाजीक परिस्थिती यावर सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आधार संस्थेचे दिपक संदानशिव यांनी केले व आभार प्रदर्शन रेणु प्रसाद यांनी केले.