अमळनेर येथे मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक संस्थांमधील विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन….

0

प्रताप महाविद्यालय व लोकमान्य विद्यालयात संपन्न झाले भूमिपूजन व उदघाटन

अमळनेर : येथे सोमवारी मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयात व लोकमान्य शिक्षण मंडळातील लोकमान्य विद्यालयात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री अनिल पाटील उपस्थित होते.

खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयात मध्यवर्ती ग्रंथालयाचे भूमिपूजन व सुसज्ज अशा नवीन डिजिटल स्टुडिओचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

त्या नंतर लोकमान्य शिक्षण मंडळाच्या लोकमान्य विद्यालयातील संगणक कक्षाचे उद्घाटन देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक व माजी चेअरमन डॉ. अनिल शिंदे, माजी चेअरमन नीरज अग्रवाल यांसह लोकमान्य शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!