मनात गद्दारी व घरावर तुतारी…. भाग 2
निकटवर्तीय व नप मधील त्यांच्याच सत्तेतील विनोद लांबोळे म्हणतात “मनोमिलन आम्ही घडवून आणले”
आणि साहेबराव पाटील म्हणतात “घरात डुक्कर घुसून आले”

व्हाट इज दिज दादा ?
अमळनेर : सोमवारी काय झाले हे कुणापासून लपून राहिलेले नाही. मंत्री अनिल पाटील यांनी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची भेट घेतली. आणि ते फोटो व्हायरल झाले. व अनिल पाटील तसेच साहेबराव पाटील यांचे निकटवर्तीयांकडून दोघांत मनोमिलन झाल्याचे संगीतले गेले. तर कृषिभूषण साहेबराव पाटील यांची नगर परिषदेवर सत्ता असतांना त्यांच्याच गटातून उपनगराध्यक्ष असणाऱ्या विनोद लंबोळे यांनी या बाबत महिती देऊन सांगितले की मंत्री अनिल पाटील व साहेबराव पाटील यांच्यात मनोमिलन झाले. काही वेळानंतर तालुक्यात व जिल्ह्यात हे वृत्त पसरले व अनेक लोकांना अलोचनांचा महापुरच केला. तेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी कृषिभूषण पाटील यांच्या एका फेसबुक पेज वरून लिहिले गेले आहे की, “घरात डुक्कर घुसून आलं, साफ करायला वेळ लागेल”, तर दुसऱ्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, “करारा जबाब मीलेगा”
एकी कडे साहेबराव पाटील यांचे निकटवर्तीय व ते नगर परिषदेत सत्तेत असतांना त्यांच्याच गटातून उपनगराध्यक्ष असणारे विनोद लंबोळे म्हणतात की आम्ही अनिल पाटील व साहेबराव पाटील या दोघांचे मनोमिलन घडवून आणले आणि दुसरी कडे साहेबराव पाटील म्हणतात कि, घरात डुक्कर घुसून आले, साफ करायला वेळ लागेल, म्हणून 9 ऑगस्ट पर्यंत वेट अँड वाच !
व्हाट इज दिज दादा ?
ये पब्लिक है सब जानती है !
