मनात गद्दारी घरावर तुतारी…. भाग १

0

साहेबराव पाटील ९ ऑगस्टला भूमिका जाहीर करणार मग सलग दोन दिवस मंत्री पाटलांच्या भेटी का ?

अमळनेर : जवळ – जवळ सर्वच पक्षांची भ्रमंती करून येणारे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बाबत मोठाच भूकंप सोमवारी मतदार संघासह जिल्ह्याने अनुभवला. रविवारी धुळ्यातील हॉटेल मध्ये दोघांची भेट तर सोमवारी अचानक मंत्री अनिल पाटील यांची साहेबराव पाटील यांच्या राजवड येथील निवासस्थानी झालेली भेट ही सगळ सांगून जाते. मात्र यात जास्त आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. कारण साहेबराव पाटील यांनी येवढे पक्ष बदलवले की आज त्यांनाच माहीत नाही की आपण कोणत्या पक्षात आहोत.

मंत्री अनिल पाटील यांना ब्लॅकमेल करण्यासाठी साहेबराव पाटील व यांच्या बगलबच्चू यांनी आपण विधानसभा लढवण्याचा प्रचार सुरू केल्याचे समजते. त्यावरून मंत्री अनिल पाटील यांना वाटेल की साहेबराव पाटील उभे राहिले तर आपला पराभव होईल. आणि अनिल पाटलांना देखील या बाबत साहेबराव पाटील यांच्या बगलबच्चू यांनी भासवून दिले… आणि या नंतर दोघांची भेट झाली धुळे येथील एका हॉटेलमध्ये…. आणि त्या ठिकाणी दोघांमध्ये एकमेकांवर राग काढण्याचे सत्र सुरू झाले. तेव्हा काही काळानंतर दोघांत समेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनिल पाटलांना विधानसभेत मदत करावी व त्यानंतर अनिल पाटील यांनी साहेबराव पाटील यांना अमळनेर नगर परिषद निवडणूकीत मदत करावी व दोघे गोड झाल्याबद्दल अनिल पाटलांनी साहेबराव पाटलांना ….(मिठाई) द्यावी अशी चर्चा झाल्याचे समजते. तर सोमवारी ठरल्याप्रमाणे मंत्री अनिल पाटील व त्यांच्या धर्मपत्नी जयश्री पाटील तसेच काही माजी नगरसेवक हे राजवडला पोहचले. यावेळी अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबराव पाटलांची गळाभेट घेतली. व ठरल्याप्रमाणे …. (मिठाई) देखील देण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अचानक जळगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यक्रमात जाऊन भाषण ठोकणारे साहेबराव पाटील आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र सोमवारी जेव्हा हा सर्व घटनाक्रम घडला व मतदार राजा थु-थू करू लागला तेव्हा मात्र साहेबराव पाटील व त्यांच्या बगलबच्चू यांच्या कडून अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या की, अफवांवर विश्वास ठेवू नका साहेबराव पाटील हे क्रांती दिनी आपली भूमिका स्पष्ट करतील.

मात्र दादा ये पब्लिक है, सब जानती है !

व्हाट ईज दिज ?

पुढील भाग नक्की वाचा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!