साथी गुलाबराव पाटील स्मृतीदीनानिमित्त स्मृती समारोह
वक्तृत्व स्पर्धेने केले जाणार गुलाबराव पाटलांना अभिवादन….
अमळनेर : विधानसभेचे तीन वेळा प्रतीनिधित्व करणारे माजी आमदार साथी गुलाब पाटील यांचे मागील वर्षी निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्मृती समारोह आयोजित करण्यात आला असून आयोजित वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातील महाविद्यालयीन तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एके काळी साथी गुलाबराव पाटील यांना “शिंगाड्यावाला शेतकरी नेता” म्हणून ओळखत असे. त्याचप्रमाचे शोध पत्रकारीतेत आपला वेगळा ठसा उमटविणारे (साथी- संदेश) साप्ताहिक दैनिकांत रुपांतरीत करून लोकांना वर्तमानपत्र वाचनाची आवड लावणारे आपल्या चौफेर वाचनाने साहित्य विश्वाला आपलेसे करणारे शत्रूलाही शरण आल्यावर मरणदारातून परत आणणारे, अनेकांकडे आवडीने खायला जाणारे व आपल्याकडे त्यांना आदराने खाऊ घालणारे खवैय्या गुलाब बापू. आपल्या अचानक कृतीने राजकारणात खळबळ उडवणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील आज आपल्यात नाहीत. याला एक वर्ष होत आलंय, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी विद्यालय बापूंच्या विविध गुणांना पुढील पिढी सोबत जोडण्यासाठी दरवर्षी
साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह
दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी साने गुरुजी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा (लोकसहभाग)
सामाजिक पुरस्कार २) राजकीय (पुरोगामी) पुरस्कार वितरण करणार आहोत. स्वरूप : – २१०००/- रोख स्मृती चिन्ह (शिंगाडेधारी गुलाबराव) लाल टोपी रुमाल (बागायतदार)
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा (महाविद्यालयीन विद्यार्थी)
: विषय :
१. आंदोलने शेतकऱ्यांची, परीक्षा सरकारची….
२. समाजवाद काल, आज, उद्या…..
३. बोल की लब, आजाद है तेरे ।
४. भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य….
५. खरा तो एकची धर्म….
: स्वरूप :
प्रथम ११०००/-, द्वितीय ९०००/-, तृतीय ७०००/-, उत्तेजनार्थ (२) प्रत्येकी २०००/- विजेत्यांना आकर्षक स्मृती चिन्ह, व इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
वरील उपक्रमांसाठी तीनही प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
1) सामाजिक पुरस्कार निवड समिती,
2) राजकीय (पुरोगामी) निवड समिती
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन समिती साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह आयोजन समिती सोबतच या समारोहाच्या यशस्वीतेसाठी अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेस अमळनेर शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव घोडपडे, मुख्याध्यापक नूतन मध्यमिक विद्यालय सुनील पाटील , हेमकांत पाटील,विलास चौधरी आदी उपस्थित होते.