राष्ट्रवादी शरद पवार गटात “लेटर बॉम्ब” :अमळनेर मधील संभाव्य आयारामान विरोधात असंतोष ?

शरद पवार यांना पत्र लिहून संधीसाधूंना उमेदवारी न देता उमेश पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी…
अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुक आतापासून रंगत चालली आहे. अनेकांचे वार पलटवार होतांना दिसत असताना आता पत्रांचा वार सुरू झाल्याचे वाटते. अमळनेर येथील उमेश पाटील यांना उमेदवारी मिळावी असे आशयाचे पत्र राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देण्यात आले आहे. हे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा संघटक प्रवीण पाटील यांनी केली आहे. यात त्यांनी उमेश पाटील यांना उमेदवारी मिळावी यांसह जे राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी मागत आहेत त्यांनाही चांगलेच धारेवर धरत त्यांना उमेदवारी देऊच नये अशीही विनंती करण्यात आली आहे.
वाचा शरद पवार यांना प्रवीण पाटील यांनी दिलेलं पत्र….
प्रती,
मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब,
राष्ट्रीय अध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
विषय — नव्याने पक्षात येऊन उमेदवारी मागणाऱ्यान ऐवजी अडचणीच्या काळात एकनिष्ठ राहिलेल्या राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष श्री उमेश पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत…
आदरणीय साहेब, सप्रेम नमस्कार. उपरोक्त विषयांनव्ये आम्ही आपणास नम्र विनंती करतो की, आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष संघटना उभारण्यासाठी श्री उमेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली, गेल्या एक वर्षाच्या काळात पक्षातील सर्वच्या सर्व नेते व पदाधिकारी दुसऱ्या बाजूला गेले असताना केवळ तुमच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन श्री उमेश पाटील यांनी महाराष्ट्रात काम सुरू केले, विरोधक आम्हाला औषधालाही न उरलेला पक्ष संपलेला पक्ष अशा वर्गना करून हिणवत असताना श्री उमेश पाटील ठामपणे आम्हा सर्व कार्यकर्त्यांसह आपल्या पक्षाचे पुरोगामी विचार, ध्येयधोरण, पक्षचिन्ह सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी दिवस रात्र एक करत होते. खंबीरपणे पक्ष सोबत राहण्याचा संकल्प करून नवनवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करत होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या पकश्याला महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रचंड प्रेम पाहता आता पक्षाला चांगले दिवस येत आहेत हे पाहून आपल्या संधीच्या शोधात असणारी आणि गेली वर्षभर आपल्यावर, आपल्या पक्षावर,तुमच्यावर सातत्याने टीका करणारे ही आपल्या पक्षात येण्यासाठी रांगा लावायला लागलेले आहेत. पण साहेब आमची आपणास कळकळीची विनंती आहे की, केवळ उमेदवारीच्या लालसेपोटी पक्षात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऐवजी निष्ठावंत सुयोग्य कार्यकर्ता म्हणून आपल्या पक्षाच्या वतीने अंमळनेर विधानसभा मतदार संघासाठी श्री उमेश पाटील यांना संधी द्यावी.ही नम्र विनंती. आज जे आपल्या पक्षात प्रवेश करून विधानसभेची उमेदवारी मागत आहे, त्यांचा इतिहास पहिला तर ते विविध पक्ष फीरून आपल्या पक्षात येण्याचा प्रयत्नात आहे, अशा पक्षा शी वैचारिक बांधिलकी नसणाऱ्यांना उमेदवारी न देता अडचणीच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष बळकट करण्यात पुढाकार घेणाऱ्या श्री उमेश पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी.कारण नव्याने आलेल्यांना उमेदवारी देऊन जर त्या उमेदवारीचा पराभव झाला तर पक्षाच्या दृष्टीने तसेच विधानसभेतील संघटनेच्या दृष्टीने व सर्वच कार्यकर्त्यांसाठी ते अन्यायकारक होईल. तरी आमच्या विनम्र विनंतीचा स्वीकार करावा धन्यवाद….
आपलाच निष्ठावंत कार्यकर्ता
श्री.प्रवीण पाटील
जिल्हा संघटक,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, जळगाव
दरम्यान या पत्राने अजून खडबड उडाली असून कोण – कोण आणि किती लोकं शरद पवार यांना भेटून उमेदवारीची मागणी करतायेत हा प्रश्न देखील उपस्थित होतो.
