आपले अनिलदादा मुंबईत गाजवताय नाव…

0

विधानपरिषदेच्या उपसभापती म्हटल्या रुळावरचा प्रवास कौतुकास्पद हाय राव !

मुंबई : आपण सर्वांनी काल्पनिक नायक चित्रपट तर पहिलाच असेल मात्र सध्या मंत्री म्हणून खरा नायक महाराष्ट्र अनुभवत आहे. दरड कोसळली तिथं असो वा पावसामुळे मुंबई ठप्प झाली तेव्हा असो महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे नायक सारखे पुढेच असतांना पाहिले जात आहेत.

या बाबत वृत्त असे की, सोमवारी मंत्री अनिल पाटील विदर्भ एक्सप्रेसने मुंबई जाण्यासाठी निघाले मात्र संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईत पाऊस धो-धो बरसत होता. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर मुंबईत रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे देखील ठप्प झाल्या. जिथल्या तिथं रेल्वे थांबल्या होत्या.

मदत व पुनर्वसन मंत्री असल्याने मंत्री अनिल पाटील यांना लवकरात – लवकर मदतीसाठी असलेल्या कंट्रोल रूमवर पोहचायचे होते. तेव्हा मंत्री अनिल पाटील यांनी कसलीही परवा न करता रेल्वेतुन उतरून रुळावरून बाहेर निघाले व जवळच असलेल्या पोलीस चौकीतून सरळ कंट्रोल रूम लागले. व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या कंट्रोल रूमला मंत्री अनिल पाटील पोहचले आणि तेथून तात्काळ जनतेला मदतकार्य पोहचवले.

मंत्री अनिल पाटील यांच्या या रुळावरील प्रवासाला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी देखील शाबासकी दिली असून त्यांनी म्हटले आहे की, तुमचा कालचा रूळावरचा प्रवास कसा झाला व हे कौतुकास्पद असल्याचे गोरे यांनी म्हटले आहे.
म्हणून आज काही ठिकाणी चर्चा सुरू होती की, “आपले अनिलदादा मुंबईत गाजवताय नाव ; विधानपरिषदेच्या उपसभापती म्हटल्या रुळावरचा प्रवास कौतुकास्पद हाय राव” !

मी सामान्य कुटुंबातून व ग्रामीण भागातून आलोय म्हणून मला रेल्वे रूळ वर चालणे किंवा कुठं दरळ कोसळल्याच्या ठिकाणी जाणे हे मला विशेष वाटत नाही. मी जनतेच्या सेवेसाठी आहे.

अनिल पाटील – मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!