अमळनेरात एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलामुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाटप
मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिळाला आधार
अमळनेर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्या वतीने एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाट वाटप करण्यात आले.
आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दर महिन्याला विविध दात्यांच्या मदतीने नियमित हा उपक्रम राबविला जात असतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील व मंत्री पाटील स्वीय सहाय्यक एल टी पाटील उपस्थित होते.जयश्री पाटील यांनी रोटरी व आधार संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत.या पीडित मुलांसाठी दोन्ही संस्था देवदूत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेलाराम सैनानी व विवेक देशमुख यांनी होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील,कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद व रोटरी क्लबचे सेक्रेटरी विशाल शर्मा आणि प्रतीक जैन यांनी केले. सूत्रसंचालन श्री संजय कापडे यांनी केले.प्रास्तविक डॉ. भारती पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी नथ्थु चौधरी, पुनम पाटील व, रोटरी क्लबचे सदस्य विजय पाटील,निलेश पाटील,महेश पाटील, ईश्वर सैनानी, किशोर लल्ला आदि उपस्थित होते.