गांधी विचार संस्कार परीक्षेत जी.एस.हायस्कूल जिल्ह्यात अव्वल
शिक्षणाधिकारी यांच्याकडून शाळेचा सन्मान
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल या शाळेने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव मार्फत घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविल्याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
जळगाव येथील कांताई सभागृहात ८ रोजी आयोजित जिल्ह्यातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभेत हा सन्मान करण्यात आला.यावेळी राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील,जिल्हाध्यक्ष गोपाल पाटील,डायट चे प्राचार्य अनिल झोपे,उपशिक्षणाधिकारी शेख,प्रतिभा सुर्वे,दीपाली पाटील तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
जी.एस.हायस्कूल ही तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील एक नामांकित शाळा असून वर्षभर शाळेत विविध शालेय तसेच स्पर्धा परीक्षेचे उपक्रम राबविण्यात येतात.गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित परीक्षेत शाळेतील ४६८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले.उपशिक्षक राहुल जगतराव पाटील,अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल,शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी, संचालक योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल,सेक्रेटरी प्रा.डॉ.ए.बी.जैन,सह सचिव प्रा.धीरज वैष्णव,उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर.शिंगाने, सी.एस.सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ,मुख्य लिपिक शाम पवार तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनदंन केले आहे.