काही तासात ठरणार जळगावचा खासदार
चुरशीच्या लढाईत खासदार वाघ की पवार ?
जळगाव : लोकसभा मतदार संघाचा खासदार कोण होणार हे अवघ्या काही तासात कळणार आहे. लोकसभा निवडणुक ही देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक असते. तर यामुळे निवडणूकीत उभे असलेल्या उमेदवारांचे देखील भविष्य ठरत असते.
जळगाव लोकसभा मतदार संघात अनेक उमेदवारांनी उमेदवारी घेतली होती. मात्र मुख्य लढत महाविकास आघाडीचे करण पवार व महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यात होती. या दोघांमूळे निवडणूक अत्यंत रंगतदार झाली. दोन्ही बाजूने मोठमोठ्या पुढाऱ्यांचे मेळावे, सभा, रॅल्या झाल्या. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या कडून जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, अनेक आमदार ठाण मांडून होते. तर राज्य तसेच केंद्रातील अनेक पुढारी व मंत्र्यांच्या सभा झाल्या होत्या. तर महाविकास आघाडीचे करण पवार यांनी देखील उत्तम प्रयत्न यावेळी केले.
सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून सुमारे 12 वाजेपर्यंत विजयाचा गुलाल उधळून कोण खासदार होईल हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.