आज जळगाव लोकसभेसाठी ३ तर रावेरसाठी ४ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

जळगाव : (जिमाका ) लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि. २३ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले. तर पाचव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ललित गौरीशंकर शर्मा या अपक्ष उमेदवाराने २ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी १ उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ नागो साळुंखे , (अपक्ष )कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष )जितेंद्र पांडुरंग पाटील, यांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष )यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. असे जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात एकूण ९ उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करण्यात आले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून ३ जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्वामी पांडुरंग पाटील, जळगाव( अपक्ष) १, रोहन गणेश सोनवणे(अपक्ष ) १, राहुल शशी कुमार सुरवाडे, जळगांव यांनी युवराज भीमराव जाधव, चाळीसगाव ( वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी 03, नंदू शामराव पाटील (अपक्ष ) १, महेश सुपडू महाजन, जळगांव ( अपक्ष) १, प्रा. प्रताप मोहन कोळी, जळगाव (अपक्ष ) १, संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी जळगाव, (अपक्ष ) १ असे एकूण ७ उमेदवारांनी 10 अर्ज घेतले आहेत.


रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले आहेत. त्यात युवराज देवसिंग बारेला, चोपडा( बहुजन समाज पार्टी) २, जालम सिंग उत्तम सिंग वतपाळ, नांदुरा( अपक्ष) २, युनूस अब्दुल तळवी यावल यांनी ममता भिकारी तळवी यावल( अपक्ष)यांचेसाठी २, अमोल गोपाल शिरपूरकर, बोदवड ( अपक्ष) २, दीपक रतिलाल चव्हाण,पाळधी श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर(अपक्ष ) ४, दीपक पद्माकर भालेराव, रावेरयांनी संजय अर्जुन चौधरी,रावेर ( अपक्ष) ४, अविनाश विष्णू सोनवणे, जळगाव यांनी श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ) यांच्यासाठी ४, योगेंद्र विठ्ठल कोलते, मलकापूर(बहुजन समाज पार्टी )२, आनंद जनार्दन तेलंग, मलकापूरयांनी सौ. अनिता योगेंद्र कोलते,मलकापूर (बहुजन समाज पार्टी ) २ असे एकूण ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी ललित गौरीशंकर शर्मा, जळगाव (अपक्ष )या उमेदवाराने २ अर्ज तर करण बाळासाहेब पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )यांनी १ अर्ज दाखल केला आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना करण पवार यांनी अ आणि ब फॉर्म (A B form )सादर केलेला नाही.असे मंगळवारी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी ३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी. एकनाथ नागो साळुंखे , (अपक्ष )कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष )जितेंद्र पांडुरंग पाटील, यांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष )यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी दिनांक २३ रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ३ तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ६ असे एकूण ९ अर्ज दिवसभरात दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!