ताडे नाल्याला शुद्धीकरणाची गरज…
दुर्गंधाने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अमळनेर : शहरातील ताडेपुरा भागात असणाऱ्या ताडे नाल्याला शुद्धीकरणाची गरज असून त्यातील पाणी व इतर घाणीने नागरिक त्रस्त झाले असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ताडे नाला म्हणजे ताडे तलाव हा खूप मोठा असून त्यात बाराही महिने पाणी साचलेले असते. काही भागांमधून सांड पाणी याठिकाणी जमा होत असते. मात्र हे पाणी एकाच ठिकाणी साचत असल्याने त्याची विल्हेवाट लावली जात नाही किंवा त्याचे शुद्धीकरण देखील केले जात नाही. त्या कारणाने या पाण्यातून व त्याठिकाणी साचलेल्या घाणीतून गेल्या काही दिवसांपासून दुर्गंध येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.