शिक्षण संस्थेच्या कार्यालयाला आग! कागदपत्रे जळाली?

0
IMG_20251201_184837

अनेक कागदपत्रे जळून खाक

 

अमळनेर :  येथील एका शिक्षण संस्थेच्या कार्यालयाला रात्रीच्या वेळी आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संस्थेचे महत्त्वाच्या असलेल्या कार्यालयीन फाईली, जुने ऑडिट रिपोर्ट, आवक-जावक नोंदी, लेटरहेडसह विविध कागदपत्रे आगीत जळाल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते.

उपलब्ध पत्रव्यवहारात जुने ऑडिट रिपोर्ट, आवक-जावक फाईल, लेटरहेड आणि अन्य कागदपत्रे आगीत जळाल्याचा उल्लेख असल्याचे दिसते. ही कागदपत्रे संस्थेच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात.

आग लागणे केवळ योगायोग?

महाराष्ट्रभर शैक्षणीक संस्थांची चौकशी सुरू असताना संबंधित कार्यालयातील कागदपत्रे आगीत नष्ट होणे हा केवळ योगायोग असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!