प्रभाग 6 मध्ये सविता संदानशिव व दिपक चौगुले यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कप-बशी चिन्हाची चर्चा; नागरिकांनी व्यक्त केला विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास

अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असताना प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला विशेष वेग प्राप्त झाला आहे. रविवारी उमेदवार सौ. सविता योगराज संदानशिव व दिपक हरी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली भव्य आणि शिस्तबद्ध प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीने प्रभागातील निवडणूक वातावरणाला विशेष उभारी दिली.


रॅलीची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात झाली. प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीत शेकडो कार्यकर्ते, महिला, युवा वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. घोषणाबाजी, विविध बॅनर्स, फेस्टून आणि लहान मुलांचाही उत्साह यामुळे संपूर्ण प्रभागात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.
उमेदवारांचे कप-बशी हे निवडणूक चिन्ह मतदारांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवत असून रॅलीदरम्यान अनेकांकडून या चिन्हाला प्रत्यक्ष समर्थन मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विकासकामांबाबत काटेकोर भूमिका, प्रामाणिक नेतृत्व, नागरिकांसाठी सहज उपलब्धता आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन या गुणांमुळे दोन्ही उमेदवारांविषयी मतदारांमध्ये विश्वास वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या रॅलीत माजी नगरसेवक मोहन सातपुते आणि श्याम संदानशिव यांची उपस्थिती विशेष ठरली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि अनुभवी नेतृत्वामुळे उमेदवारांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. दोन्ही माजी नगरसेवकांनी प्रभागातील विकासकामांचा आढावा घेत पुढील काळात गतिमान कामकाज करणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
रॅलीच्या यशस्वी आयोजनामुळे प्रभाग 6 मध्ये शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीने दमदार शक्तीप्रदर्शन केले असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत हा उत्साह मतांमध्ये परिवर्तित होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
