प्रतिभा गजरे यांच्या प्रचाराला वेग
प्रत्यक्ष भेटींमध्ये मतदारांचा वाढता कल

अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीची सरशी वाढत असताना प्रभाग क्रमांक 6 मधील आम आदमी पक्षाच्या उमेदवार सौ. प्रतिभा गजरे यांच्या प्रचारमोहीमेची जोरदार सुरुवात झाली आहे.
पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष भेटीगाठींच्या माध्यमातून त्यांनी मतदारांपर्यंत पोहोच करण्यास सुरुवात केली असून परिसरातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सौ. गजरे या उच्चशिक्षित, कुशाग्र बुध्दीच्या आणि अभ्यासू स्वभावाच्या उमेदवार म्हणून प्रभागात चांगल्याच ओळखल्या जातात. मतदारांशी संवाद साधताना त्यांनी प्रभागातील समस्या, सुविधांची कमतरता तसेच विकासाबाबतच्या नागरिकांच्या अपेक्षा समजून घेतल्या. त्यांच्या या संवादात्मक पद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरगुती भेटींमध्ये महिलांनी सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, लाईटची समस्या याबाबत सूचना दिल्या असता सौ. गजरे यांनी प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून त्यावर ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. युवकांशी झालेल्या चर्चेत रोजगारमार्गदर्शन, खेळाच्या सुविधा आणि कौशल्यविकास उपक्रमांची गरज स्पष्टपणे समोर आली. यावरही सकारात्मक दृष्टीकोनातून उपाययोजना राबवण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
स्थानिक नागरिक, महिला बचतगट, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आम आदमी पक्षाच्या प्रचाराला प्रभाग 6 मध्ये जोरदार गती मिळत असल्याचे जाणवत आहे. विशेष म्हणजे, अभ्यासू आणि तळमळीने काम करणाऱ्या उमेदवाराची निवड या वेळी मतदार प्राधान्याने करत असल्याचे चित्र उभे राहत आहे.
एकूणच, प्रतिभा गजरे यांच्या प्रचाराला मिळालेली दमदार सुरुवात आणि मतदारांचा वाढता कल पाहता प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक अधिकच रंगतदार होणार हे निश्चित दिसत आहे.
