पत्रकारितेपासून केले समाजकार्य, आता भरीव विकासकार्यासाठी राजकारणात ठेवले पाऊल…
नागरिकांच्या भरीव पाठिंब्यावर प्रभाग 9 ‘ब’ मधून चेतन राजपूत यांची दमदार एंट्री…

अमळनेर : येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 ‘ब’ (जनरल पुरुष) मतदारसंघात कर्तबगार, विकासाभिमुख आणि प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले चेतन देवसिंग राजपूत यांनी उमेदवारीची जोरदार दावेदारी सादर केली आहे.संपूर्ण शहरात त्यांच्या उमेदवारीची सकारात्मक चर्चा असून सर्व स्तरातून त्यांना समर्थन मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र आणि स्थानिक विकास या तिन्ही आघाड्यांवर सक्रिय राहून केलेल्या कामामुळे ते प्रभागातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.चेतन राजपूत हे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष असून दैनिक जनवास्तव या वृत्तपत्राद्वारे अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. अमळनेर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे उपसभापतीपद ही त्यांनी भूषवले आहे. भरीव सांस्कृतिक कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी न्यू प्लॉट परिसर विकास मंचाची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली आहे. या विविध पदांवर कार्यरत राहून त्यांनी समाजातील प्रत्येक स्तराशी घट्ट नाळ जुळवली आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, प्रशासनाचे लक्ष वेधणे, नागरिकांच्या अडचणींचा आवाज बुलंद करणे आणि अनेक स्थानिक समस्या सोडवण्यासाठी धडपड करणे, ही चेतन राजपूत यांची गेल्या दशकभरातील ओळख राहिली आहे. पत्रकार म्हणून वस्तुनिष्ठता आणि प्रामाणिकता, समाजकार्यात संवेदनशीलता, तर विकास प्रश्नांवर भक्कम भूमिका—या सर्व गुणांमुळेच त्यांच्या नेतृत्वाची छाप नागरिकांमध्ये दृढ झाली आहे. त्यांच्या पुढाकारातून उद्याने, रस्ते, सार्वजनिक सुविधा, गल्ल्यांचे सुशोभीकरण आणि अनेक लहान-मोठे कामे प्रभागात पूर्ण झाली. पदावर नसतानाही केलेल्या या कामांनी त्यांची प्रतिमा कर्तबगार आणि कृतीशील नेतृत्व अशी झाली आहे. चेतन राजपूत यांनी सांगितले आहे की, “पत्रकार म्हणून समाजातील वेदना, अन्याय आणि विकासाची गरज जवळून पाहिली. आता प्रत्यक्ष राजकारणात उतरून प्रभाग 9 मध्ये ठोस आणि दीर्घकालीन विकासकामे राबवण्याचा निर्धार केला आहे.”
त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि केलेल्या कामांचा फायदा प्रभागातील नागरिकांना आगामी काळात मोठ्या प्रमाणात होईल, अशी मतदारांमध्ये चर्चा आहे.
तरुणाई, महिला व ज्येष्ठांचे आहे पाठबळ…
चेतनभाऊ राजपूत मित्र परिवार, प्रभाग क्रमांक 9, अमळनेर यांच्या नेतृत्वाखाली तरुणाई, महिला, समाजातील विविध घटक, व्यापारी वर्ग, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा चेतन राजपूत यांना मिळत असल्याचे दिसून येत आहे.
