अमळनेरात आयशरवाल्याने तिघांना उडवले….
दोन ठार एक गंभीर जखम

अमळनेर : येथील हेडावे नाक्याजवळ आयशर चालकाने तिघांना उडवल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता घडली असून या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी आहे.
यात एकरुखी येथील विश्वनाथ हिम्मत भिल्ल व ज्योत्याबाई विश्वनाथ भिल्ल हे जागीच ठार झाले असून बाळू साहेबराव पाटील हा जखमी झाला असून तिघांना ग्रामीण रुग्णालयात नेले आहे.
