मुलाला चाकू तर महिलेचे तोंड व हात बांधून घर लुटले…

 

अमळनेर : येथील आयोध्या नगर बंगाली फाईल भागात सकाळीच दरोडा पडला आहे. घरमालक दीपक पाटील रेल्वे मध्ये नोकरीला असून ते ड्युटीला गेल्यानंतर सदर घटना घडली. दीपक पाटील यांच्या मुलाला चाकू लावून तर त्यांच्या पत्नीचे तोंड तसेच हातपाय बांधून घर लुटले आहे. यात घरमालक यांच्या आई व मुलाच्या अंगावरील सुमारे 7 तोळे सोने, पत्नीच्या अंगावरील सोन्याची माळ, बांगड्या व अंगठ्या तसेच 40 ते 50 हजार रुपये रोकड असे दरोडा टाकून लुटून नेले आहे.

या दरोळ्यात सुमारे 4 लोकांचा समावेश असल्याचे आमच्या सूत्रांनी सांगितले आहे.

याबाबत पोलिसांत पुढील कारवाई सुरू असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हवालदार विनोद सोनवणे, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, उदय बोरसे, प्रशांत पाटील, गणेश पाटील यांच्यासह इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!