मुख्याध्यापकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग ?

1

अमळनेरातील घटना; चर्चांना उधाण….

 

अमळनेर : शहरातील एका हायस्कूलमधील मुख्याध्यापकाने त्याच्याच शाळेतील विद्यार्थीनीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणामुळे संबंधित विद्यार्थीनीची शाळा देखील बंद झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित विद्यार्थीनी अमळनेर शहरातील एका हायस्कूलमध्ये 9वी वर्गात शिकत होती. तिची आई संबंधित मुख्याध्यापकाच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. याचा फायदा घेत काही दिवसांपूर्वी या मुख्याध्यापकाने तिच्या गुप्तांगांना स्पर्श करत तिला आपल्या मांडीवरही बसण्यासाठी सांगितले व तिचा विनयभंग केला. सदर बाब त्या विद्यार्थीनी ने आपल्या शाळेतील आई समान असलेल्या शिक्षिकांना देखील सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ते महान काम करणारा महाशय हा आपल्या शाळेचा शाळेचा मुख्याध्यापक असल्याने संबंधितांनी तो विषय दाबण्याचा प्रयत्न केला. सदर बाब नाईलाजास्तव त्या विद्यार्थीनीने आपल्या घरी सांगितला असता त्यांनी शाळेत धाव घेतली मात्र संबंधित मुख्याध्यापकाने माफी मागितली व शाळेच्या इतर जबाबदार लोकांनी देखील या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने सदर बाबतीत गुन्हा दाखल होणे टळले असल्याच्या चर्चा अमळनेर शहरात सुरू आहेत.

त्याच्या वर दाखल होणार गुन्हा टळला मात्र संबंधित विद्यार्थीनीचे जर खरंच शिक्षण बंद झाले असेल तर याला जबाबदार कोण आहे हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.

1 thought on “मुख्याध्यापकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग ?

  1. सर हि आपली बातमी पाहतो पण आपल्या बातम्या पुर्ण नसतात. व आपण पुढचा भाग टाकतच नाही . आता ह्या गोष्टीत तर शाळेचे नाव तर टाका. कारण आपण बातमी मोघम देतात. नंतर पुढील भागात म्हणतात आम्ही तुमच्या वृत्तपत्राचे रसीक व नेहमी बातमी वाचणारे आहोत पण आपण आम्हाला पुढचा भाग दाखवताच नाही मग आपण का फक्त बातमी देवुन सेटेलमेट करतात हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!