भोरटेक शाळा बंद : दोन वर्षांपासून विद्यार्थी नव्हते मग आताच शाळा बंद करण्याचा आव आताच कसा ?

0

शाळेला कुलूप ठोकण्याचा अधिकार गट शिक्षणाधिकाऱ्यांना आहेत का ?

अमळनेर गट शिक्षणाधिकारी चमकोगिरी करताय की काय ?

अमळनेर : तालुक्यातील भोरटेक येथील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा बंद झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. विद्यार्थी नसल्यामुळे ही शाळा बंद पडली असे प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी म्हटले होते. मात्र या शाळेत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एकच विद्यार्थी शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. मग आताच ही शाळा बंद करण्याचा आव कसा आला ? तर ज्या शिक्षकांशी आपले जमत नाही त्यांची गैरसोय व्हावी यासाठी ही शाळा बंद केल्याचेही समजते.

अमळनेर तालुक्यातील एका शिक्षकाशी प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांचे जमत नाही, म्हणून त्यांच्या पोर्टलवर संबंधित शिक्षकांची त्या शाळेवर बदली होत आहे असे समजल्यावर रावसाहेब पाटील यांनी तात्काळ भोरटेक शाळेला भेट देऊन कुलूप ठोकले व शाळा बंद पडली असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांना दिले आहे. मात्र सदर शाळेत गेल्या दोन वर्षांपासून एकच विद्यार्थी शिकत असल्याचे गट शिक्षणाधिकारी यांना समजले नाही का ? व आपली भेट झाली तेव्हाच जर विद्यार्थी तेथे नव्हते तर लगेच शाळा बंद करता येते का ? शाळा बंद करण्याचा अधिकार गट शिक्षणाधिकारी यांना आहेत का? असे असंख्य प्रश्न उपस्थित करत अमळनेर गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्याविरोधात कायदा पालन संघाने जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून शाळा बंदचा निर्णय झाल्यानंतरच प्रसार माध्यमांना वृत्त देता येते मात्र तसे न करता स्वतः कुलूप ठोकून येऊन प्रसार माध्यमांना वृत्त देऊन रावसाहेब पाटील चमकोगिरी करताय का असा सवालही कायदा पालन संघाने उपस्थित केला आहे.

पुढील वृत्तात नक्की वाचा : रावसाहेब पाटील यांचे अपंग प्रमाणपत्र खरे की खोटे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!