दर वर्षी विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार घडत असतील तरी शिक्षकावर कारवाई का नाही ?
मारवड हायस्कूलचा शिक्षक बागुल चेअरमनचा नातलग असल्यानेच तर नाही ना पाठीशी घातले जात ?
अशा शिक्षकांमुळे शाळेचा दर्जा घसरला….?

अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील सुरजमल हिरालाल मुंदडे हायस्कूल येथील माथेफिरू शिक्षक संजय रमेश बागुल याच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्याच्या दर वर्षी तक्रारी असतात मात्र तरी देखील त्यावर शाळा स्तरावर कारवाई का केली जात नाही ? किंवा हा शिक्षक विद्यमान चेअरमन जयंत पाटील यांचा नातलग असल्याने त्याला पाठीशी घातले जातेय का असा सवाल मारवड येथील सुज्ञ नागरिकांनी दिव्य लोकतंत्रशी बोलतांना उपस्थित केला आहे.
बागुल या शिक्षकामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या देखील कमी झाली असून तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे सुमारे 12 किलोमीटर विद्यार्थी पायपीट करीत शाळेत जातात, पण या शाळेत जात नाहीत. याच शाळेत पाचवी पासून ते पदवी पर्यंत शिक्षण आहे. मात्र पाहिजे तेवढी विद्यार्थी संख्या नसल्याने शाळा काही वर्षात बंद पडू शकते.
एके काळी या शाळेत एका वर्गाच्या सुमारे चार तुकड्या असतं. मात्र आज कुठं दोन तर कुठे एक तुकडी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दानशूर व्यक्ती व गावकऱ्यांनी सुरू केलेली संस्था काही लोकांपुरता मर्यादित राहिली असल्याने संस्था उभी करुन आमचा उपयोग काय झाला असा सवाल अनेक मारवडकर व पंचक्रोशीतील नागरिक विचारू लागले आहेत. कारण या संस्थेत सुमारे 30 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यमान चेअरमन जयंत पाटील यांचेच नातलग असून हे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर दाब टाकतात व काही विद्यार्थ्यांना देखील नाहक त्रास देत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान संजय बागुल या माथेफिरू शिक्षकाला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
