द्वितीय प्रफुल लोढा अमळनेरात…
आंबटशौकीन खाशी मंडळ संचालकाची पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशी करावी
अन्यथा प्रफुल लोढासारखे प्रकरण अमळनेर तालुक्यात घडायला वेळ लागणार नाही

अमळनेर : तालुक्यातील द्वितीय प्रफुल लोढा आहे असून या बाबत जळगाव पोलीस अधीक्षक यांना गुप्त यंत्रणा नेमून सखोल चौकशी करावी अशी मागणी अमळनेर तालुक्यातील सुज्ञ नागरिक व खाशी मंडळ फेलो यांच्या मार्फत होत आहे. कारण या प्रकरणी अमळनेर पोलीस व बाह्य यंत्रणेचे 2 लोकं अशांचे हात रंगले असल्याची चर्चा रंगली आहे. म्हणून ही चौकशी होत आहे असे समजू सुद्धा नये यासाठी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी गुप्त यंत्रणेतून चौकशी करावी असे बुद्धिजीवी लोकांचे म्हणणे आहे.
प्रफुल लोढा हा व्यावसायिक होता. कोणत्याही पदांवर नसतांना अनेक बडे पुढारी, मंत्री, अधिकारी अशांची त्याचे संबंध होते. मात्र हनी ट्रॅप मध्ये त्याचे नाव यायला लागले आणि एक मोठं प्रकरण उघड झाले. त्यात प्रफुल लोढा याने अनेक महिलांची पिळवणूक केली असल्याचे उघड झाले. आणि त्यावर बलात्कार, पोस्को, यांसारखे अनेक गुन्हे दाखल झाल्याचे उघड झाले. आणि आज तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
असाच एक प्रफुल लोढा अमळनेर तालुक्यातही….
असाच एक प्रफुल लोढा अमळनेर तालुक्यातही जन्मला असून तो देखील खाशी सोडून कुठल्याही उच्च पदांवर नसतांना त्याचे मोठं-मोठ्या पुढारी, नेते व अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. याने देखील 9 जुलै रोजीच्या घटनेतील कावेरीला (महिला असल्यामुळे नाव बदल) ज्या पद्धतीने फसवले त्याच पद्धतीने अनेक महिलांना देखील फसवले असल्याची दाट शक्यता आहे. म्हणून प्रफुल लोढा प्रमाणे अमळनेरचेही नाव खराब होऊ नये यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या गुप्त यंत्रणेमार्फत चौकशी करून अमळनेरच्या प्रफुल लोढाच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी सुज्ञ व बुद्धिजीवी अमळनेरकर करीत आहेत.
पुढील वृत्त लवकरच….
