फापोरे – मंगरूळ रस्त्यावरील वाळू चोरीला….
तहसीलदारांचा वाळू माफियांच्या डोक्यावर हात नसेल तर गुन्हा दाखल करावा

अमळनेर : अनेक ठिकाणी वाळूचे ढीग आहेत. व त्यातच फापोरे – मंगरूळ रस्त्यावर वाळूचा मोठा ढिग असून ही वाळू जप्त करून कारवाई व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे वृत्त दिव्य लोकतंत्रने 20 जून शुक्रवार रोजी प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर तहसीलदार अमळनेर यांनी त्याच दिवशी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाठवून पंचनामा देखील केला होता. मात्र ही वाळू चोरीला गेली असल्याची माहीती आज मंगळवार 24 जून रोजी दिव्य लोकतंत्रला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी जाऊन बघितले असता तेथे खरंच वाळू चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे.
शासनाच्या ताब्यात जाऊनही वाळू चोरीस जात असेल तर वाळू माफियांच्या डोक्यावर कुणाचा तरी हात असल्याचे दिसून येते. मात्र हा हात कुणाचा असू शकतो ह्या प्रश्नाच्या जवळच दिव्य लोकतंत्र असुन याचे उत्तर लवकरच अमळनेर तालुक्यातील जनतेला व राज्य शासनाला लवकरच कळणार आहे. मात्र हा सध्याचा हात जर अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांचा नसेल तर त्यांनी सरळ पोलिसात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करावा व आपला वाळू माफियांच्या डोक्यावर हात नाहीच हे स्पष्ट करावे अशी मागणी बुद्धिजीवी वर्गातून होत आहे.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या बाबत अनेक ठिकाणी संशय व्यक्त होईल असे कृत्य त्यांचे असते. आपला हात कशाने भरला नाही तर कारवाई करण्यास एवढी दिरंगाई का होते हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो.
