अमळनेरात आमसभा घेण्यास काय अडचण ?
अनेक प्रश्नांमुळे जनता त्रस्त, नेते व अधिकारी मस्त…
अमळनेर : मतदार संघात आमसभा घेण्यास काय अडचण आहे या प्रश्नांनी अनेक अमळनेरकर वेढले गेले आहेत. मतदार संघात अनेक अडचणी असून त्यांचे प्रश्न घेऊन जनता त्रस्त आहे. मात्र नेते, लोकप्रतिनिधी व अधिकारी मात्र मस्त मौजमध्ये असतांना दिसत आहे. जवळच असलेल्या चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चौहान यांच्या आमसभा सामाजिक माध्यमांवर गाजत असून तशाच आमसभा अनेक मतदार संघात होत असतात. मात्र अमळनेर मध्ये आमसभेला ब्रेक का लागलाय याचे उत्तर अनेक लोक शोधत आहेत.
आरोग्य, शिक्षण, सामाजिक असे अनेक विषय मतदार संघात आहेत. यांसह भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणात मतदार संघात फोफावत आहे. याचे उदाहरण अमळनेर पंचायत समिती घेता येईल. असे अनेक विषय आपले लोकप्रतिनिधी, नेते, अधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी जनता आमसभेची वाट पाहत असून ती अमळनेरात होत नसल्याने जनतेत नैराश्य बघावयास मिळत आहे. म्हणून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी तात्काळ आमसभा घेऊन जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावेत हीच अपेक्षा !