अमळनेर मतदार संघात 12 उमेदवार अजमावणार नशीब…
तिघांमध्ये मुख्य लढत
तर माजी आमदार चौधरींनी कपबशी चिन्ह गमावल्याने बसू शकतो फटका
अमळनेर : मतदार संघात विधानसभा निवडणुक चांगलीच रंगू लागली असून यावेळी 12 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. तर तिघांमध्ये मुख्य लढत असणार आहे. मात्र काल झालेल्या चिन्ह वाटपात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपले जुने चिन्ह कपबशी चिन्ह गमावल्याने त्यांना काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमळनेर विधानसभा मतदार संघात 12 जण नशीब आजमावत आहेत त्यात काँग्रेसचे डॉ. अनिल नथ्थु शिंदे, राष्ट्रवादी कडून मंत्री अनिल भाईदास पाटील, बहुजन समाज पार्टी कडून सचिन अशोक बाविस्कर, अपक्ष उमेदवार अनिल भाईदास पाटील (रणाईचे), अपक्ष उमेदवार अमोल रमेश पाटील, अपक्ष छबिलाल लालचंद भिल, अपक्ष निंबा धुडकू पाटील, अपक्ष प्रा. प्रतिभा रवींद्र पाटील, अपक्ष यशवंत उदयसिंह मालचे, अपक्ष रतन भानू भिल, शिरीष हिरालाल चौधरी, अपक्ष शिवाजी दौलत पाटील अशा 12 जणांमध्ये ही लढत आहे.
तर मुख्य लढत तिरंगी असून डॉ. अनिल नथ्थु शिंदे, मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्यात ही मुख्य लढत आहे. तिन्ही उमेदवार हे बलाढ्य असून सध्याच्या परिस्थितीत तिघांचे पारडे जड आहे. म्हणून सध्याच्या परिस्थितीत अमळनेर मतदार संघात एक्झिट पोल सुद्धा खरे सांगू शकणार नाही.
माजी आमदार शिरीष चौधरी यांचे कपबशी हे चिन्ह मतदारांच्या मनात बसले होते. मात्र त्यांना त्यांचे कपबशी हे चिन्ह यावर्षी गमवावे लागले असून त्यांना बॅट हाती घ्यावी लागली आहे. म्हणून यावेळेस त्यांच्या बॅटिंगने ते कुणाची व्हीकेट घेता की, त्यांची बॅट इतर कुणाच्या हातात जाते हे आता तरी सांगता येणार नाही.