अवघ्या आठ वर्षांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भेगा तर नाट्यगृहावरील नावही कोसळले…
अमळनेर येथील नाट्यगृहाची परिस्थिती
अमळनेर : शहरात ऑक्टोबर २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला, या पुतळ्याचे मोठ्या थाटामाटात अमळनेर शहरात आगमन झाले होते. या पुतळ्यास अमळनेर शहरात येऊन अवघे आठ वर्ष झाले मात्र तेवढ्यातच या पुतळ्याला भेगा पडलेल्या दिसत असून पुतळ्याच्या मागे असलेल्या शिवाजी महाराज नाट्यगृहाला असलेले नाव देखील अर्धे खाली पडलेले आहे. म्हणून सध्या या पुतळ्याचा वाली कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमळनेर नगर परिषदेने नाट्यगृह देखभाल करणे व चालवण्यासाठी एका ठेकेदाराला दिले आहे. त्याची देखभाल होते आहे की, नाही हा प्रश्न वेगळा असून मात्र ज्या शिवाजी महाराजांचे कार्य जनतेसाठी मोलाचे आहे त्यांच्या पुतळ्याची व नावाची तरी देखभाल करावी हीच अपेक्षा !
दरम्यान शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देखभालसाठी काही तरुण याठिकाणी जात होते. मात्र सध्या नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप आल्याने सध्या त्या तरुणांना देखील जाता येत नाहीये. म्हणून हे द्वार तात्काळ उघड करावे अशी मागणी होत आहे.