पातोंडा प्रार्थमिक आरोग्य केंद्राला कुलूप कशासाठी ?
सुट्टीच्या दिवशी लोकं आजारी पडत नाहीत का ?
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा प्रार्थमिक आरोग्य केंद्र आज बंद होते, एका शेत मजुरांची शेतात काम करतांना तबेत खराब झाली व तो दवाखान्यात गेला तेव्हा ही बाब समजली. तेव्हा त्यास शेत मालकाने अमळनेर व अमळनेर हुन धुळे घेऊन जात त्यावर उपचार केले. तर काही ठिकाणी या बाबत माहिती घेतली असता असे समजले की आज रविवार असल्यामुळे दवाखाना बंद होता. व दर सुट्टीच्या दिवशी हा दवाखाना बंदच असतो असे काही लोकांनी सांगितले आहे. म्हणून सुट्टीच्या दिवशी लोकं आजारी पडत नाहीत का ? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील एक शेतमजूर हा शेतात कामासाठी गेला होता त्यास शेतात काम करीत असतांना त्रास होऊ लागला हे पाहून शेतमालकाने त्यास तात्काळ गावातील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले, मात्र तेथे दवाखान्यास सरळ कुलूप ठोकलेले असल्याने त्यांना माघारी जावे लागले असून ते रुग्ण अमळनेर आले व अमळनेर येथून त्यास पुढील उपचारासाठी धुळे नेण्यात आले होते. याबाबत गावातील लोकांकडून माहिती घेतली असता त्यावरून समजले की, हा दवाखाना दर सुट्टीच्या दिवशी बंद असतो व कुणी बोलायला गेले तर सुट्टीचे कारण सांगितले जाते असे गावकऱ्यांनी व इतर लोकांनी सांगितले आहे. म्हणून सुट्टीच्या दिवशी लोकं आजारी पडत नाहीत का ? असा सवाल आता लोकं उपस्थित करू लागले आहेत.
तर दवाखाना बंद ठेवणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी हीच अपेक्षा !