डॉ. अनिल शिंदे किंवा श्याम पाटील होऊ शकता तुतारीचे दावेदार…
कृषिभूषण पाटील यांच्यासह अनेक इच्छुक बॅकफूटवर
अमळनेर : मतदारसंघात महाविकास आघाडी मध्ये इच्छुकांची भली मोठी यादी होती. ही जागा आपल्या पक्षाला सुटावी यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे आग्रही होते. मात्र ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास देण्यात आली, यात देखील सुमारे 9 उमेदवारांची भली मोठी लाईन होती. तर राष्ट्रवादीला ही जागा सुटल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अमळनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे हे देखील प्रयत्नशील आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमळनेर शहराध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील हे देखील तिकीटासाठी आग्रही आहेत.
डॉ. अनिल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा यासाठी त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या हायकमांड कडून सांगण्यात आले असल्याचे समजते. म्हणून डॉ. शिंदे यांनी 10 हजार रुपये अनामत रक्कम सह आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे दाखल केला होता. त्यानुसार त्यांची मुलाखत देखील झाल्याचे समजते. तर आता पर्यंत त्यांचे देखील नाव आघाडीवर आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांना तिकीट मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र काही कारणास्तव कृषिभूषण पाटील यांनी उमेदवारी न घेण्याचा निर्णय घेतला असल्याने ते बॅकफूटवर गेले असल्याचे समजते. तर इतर उमेदवारांचे मेरिट कमी असल्याने त्यांना तिकीट मिळणार नाहीये.
म्हणून सध्या डॉ. अनिल शिंदे व श्याम पाटील हेच दोन्ही आघाडीवर असून यांच्यातीलच कुणा एकाला तिकीट मिळणार आहे.
दरम्यान श्याम पाटील हे गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असून आज डॉ. अनिल शिंदे यांनी देखील मुंबईची वाट धरली आहे. तिकीट बाबत उद्या घोषणा होणार असल्याचे समजते.
तर उर्वरित इच्छुक उमेदवारांनी मात्र आमदारकीचा नांद सोडून जिल्हा परिषदेची तयारी सुरू केल्याचे समजते.