कृषिभूषण साहेबराव पाटील तुतारी फुकणार…
प्रदेशवरुन हालचाली सुरू ; येत्या दोन ते तीन दिवसांनी घोषणा होणार… सूत्र
अमळनेर : विधानसभेचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे तुतारी फुंकणार असल्याचे आता जवळ – जवळ स्पष्ट झाले आहे. याबाबत प्रदेशावरून हालचाली सुरु झाल्या असून येत्या दोन ते तीन दिवसांनी अधिकृतपणे घोषणा होणार असल्याची माहिती आमच्या सुत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सर्व्ह केला होता त्यात कृषिभूषण पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे.
2009 ते 2014 या काळात साहेबराव पाटील यांनी आमदार म्हणून केलेले काम व नगर परिषदेत सत्ता असतांना त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष असतांना त्यांनी केलेले काम त्यामुळे जनतेने कृषिभूषण साहेबराव पाटील यांना पसंती दिल्याचे समजते.
अमळनेर मधील इच्छुक उमेदवार यांच्यात कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे पारडे जड असल्याचे समजते.