“बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना”
शाम पाटलांच्या आंदोलनात अनेकांनी शेकल्या पोळ्या

अमळनेर : मतदार संघात इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भाऊ गर्दी झाली असून अनेक ठिकाणी श्रेय घेतांना ते दिसत आहेत. आंदोलने किंवा काही कार्यक्रमं दुसऱ्याने आयोजित करायचे व तेथे जाऊन फोटो काढायचे आणि सामाजिक माध्यमांवर व्हायरल करायचे अशी कामे सध्या इच्छुक उमेदवारांचे तालुक्यात सुरू आहे.
असाच एक प्रसंग काल सोमवारी घडला, सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमळनेर शहराध्यक्ष व इच्छुक उमेदवार श्याम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या एका विषयात धरणे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात इतर उमेदवारांनी त्यांचे कार्यकर्ते न आणता फक्त स्वतः येऊन चमकोगीरी करत फोटो व व्हीडिओ काढत ते सामाजिक माध्यमातून व्हायरल केल्याचा प्रकार घडला आहे. या आंदोलन स्थळी अनेकांनी बसताना, बोलतांना, चालताना व्हीडिओ व फोटो काढत आपले रिल्स बनवत ती सामाजिक माध्यमांवर व्हायरल केले आहेत.
मात्र हे आंदोलन यांचे की श्याम पाटलांचे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
या आंदोलनात अनेकांनी आपल्या पोळ्या शेकत “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना” झाला असल्याचा दुजोरा दिला आहे. यापुढे असे न करता इच्छुक उमेदवारांनी पुढील विधानसभा येई पर्यंत जोमाने काम करावे व तिकिटसाठी पात्र ठरावे येवढेच !
