उमेदवार दीड डझन मात्र आंदोलनात संख्या बोटावर मोजण्याइतकी

0

आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आत्मचिंतनाची गरज

या आंदोलनात कृषिभूषण पाटील नसल्याने दबक्या आवाजात चर्चा ?

 

अमळनेर : मतदार संघात सध्या महाविकास आघाडीत इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. यात सुमारे दीड डझन इच्छुक उमेदवार आहेत. यातील काही उमेदवारांच्या मागे 100 तर सोडा मात्र 50 कार्यकर्ते देखील नसल्याचे दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे आज शेतकऱ्यांच्या विषयावर अमळनेर तहसील कार्यालयाच्या शेजारी महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन होते. या आंदोलनात एका उमेदवाराने जर 100 कार्यकर्ते देखील आणले असते तर आंदोलनाला रंगत आली असती. मात्र “चार घरे आणि तिरपा दारे” ह्या अहिराणीतल्या म्हणी प्रमाणे यांची अवस्था झाली आहे. यांची घरे तर जास्त आहेत मात्र त्यांची सगळ्यांची तिरपी दारे असल्याचे दिसून येते. या आंदोलनात अमळनेर मतदार संघाचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील तसेच त्यांचे इतर निकटवर्तीय यांचा समावेश नव्हता.

कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याबद्दलच उपस्थितांमध्ये जास्त चर्चा ऐकायला मिळाल्या. कृषिभूषण पाटील हे शेतकऱ्यांसाठी कायम धडपडत असतात, त्यांना शेतकऱ्यांची जास्त जाण आहे, ते स्वतः शेतकरी असल्याने ते आपल्या अडीअडचणी समजू शकतील. तर काही लोकं म्हणत होती, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सुमारे दोन वेळेस अमळनेर मतदारसंघात ओलादुष्काळ जाहीर व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. म्हणून आम्हाला वाटले होते की ह्या आंदोलनात कृषिभूषण साहेबराव पाटील हे देखील असतील मात्र ते का नाहीत असा प्रश्न देखील काहींनी उपस्थित केला आहे. साहेबराव पाटील असते तर आंदोलनास मोठी गर्दी राहिली असती अशीही चर्चा यावेळी सूरू होती.

दरम्यान महाविकास आघाडीत उमेदवारांची संख्या सुमारे दीड डझन वर आहे. मात्र आंदोलनात कार्यकर्त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती आणि यातही दुसऱ्या उमेदवाराच्या अपेक्षेत आलेल्यांची देखील काही संख्या होती. म्हणून आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या या इच्छुक उमेदवारांमध्ये सध्या आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

एवढेच !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!