राजा राजवडला जाण्याच्या तयारीत आहे आणि जनता कशी साथ देणार ?
कृषिभूषण पाटलांच्या फोटोंवर व्हीडिओ करून तुमच्या राजाला साथ द्या गाणे होतेय व्हायरल
अमळनेर : मतदार संघाचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तुतारी फुंकणार असल्याची इच्छा व्यक्त करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांनी पक्षाला रोख 10 हजार निधी देखील दिला होता. मात्र दिनांक 7 रोजी पुणे येथे शरद पवार यांनी घेतलेल्या मुलाखतीत साहेबराव पाटील यांनी दांडी मारल्याने ते उमेदवारी करणार नाहीत असे समजते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर “तुमच्या राजाला साथ द्या !” ह्या गाण्यावर त्यांचे फोटो वापरून व्हीडिओ तयार करत तो व्हायरल करण्यात येत आहे. मात्र राजा राजवडला जाण्याच्या वाटेवर आहे आणि जनता कशी साथ देईल अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.