आधी उतरवली घरावरची तुतारी…
मात्र आता साहेबराव पाटलांना त्याचसाठी करावी लागली मुंबई वारी
अमळनेर : विधानसभेचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्या नंतर त्यांचे मूळ गाव राजवडची वाट धरली होती. तब्बल तीन ते चार वर्षांनी ते आता पुन्हा अमळनेरात आले आहेत.
कृषिभूषण पाटील हे राजकिय जीवनापासून काही दिवस दूर होते, मात्र जळगाव येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अचानक साहेबराव पाटील यांनी हजेरी लावली व त्या दिवशी राजभवन ह्या त्यांच्या घरावर तुतारी वाजली व दुसऱ्या दिवशी चढली देखील होती. मात्र पुन्हा काही दिवसांनी मी अपक्ष उमेदवारी करेल असे म्हणत ती तुतारी साहेबराव पाटलांनी घरावरून उतरवली होती.
मात्र आता पुन्हा काही दिवसांपासून तीच तुतारी घेण्यासाठी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी घेण्यासाठी कृषिभूषण साहेबराव पाटील यांना पुन्हा मुंबईची वाट धरावी लागली आहे. म्हणून जर साहेबराव पाटलांना तुतारी घ्यायचीच होती तर ती तेव्हा उतरवलीच का हा प्रश्न उपस्थित होतो.