माजी आमदार साहेबराव पाटलांची राजकिय आखाड्यात उतरल्याची चर्चा खरी की सेलटमेंट
राष्ट्रवादी SP कडून उमेदवारी मागणं म्हणजे मंत्री अनिल पाटलांच निवडून येणं सोयीस्कर ?

अमळनेर : मी अपक्ष निवडणूक लढवून 2009 ची पुनरावृत्ती घडवून आणेल असे सांगणारे अमळनेर मतदार संघाचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबई गाठत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीची अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र माजी आमदार साहेबराव पाटील यांची राजकीय आखाड्यात उतरल्याची चर्चा खरी आहे की, मंत्री अनिल पाटील यांना निवडुन येण्यासाठी सोयीस्कर सेटलमेंट आहे या बाबत अमळनेरात चर्चा सुरू झाल्या आहेत.
कारण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल पाटील व कृषिभूषण साहेबराव पाटील यांची पुण्यातील दौंड येथे बैठक झाल्याची चर्चा जोरात होती. त्यात ठरले होते की, काहीही करून कृषिभूषण पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी घ्यावी असे सांगण्यात येते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी कृषिभूषण पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. साहेबराव पाटील हे सहजासहजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत हे देखील सत्य आहे. कारण ते आमदार असतांना शरद पवार यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी साथ दिली होती, असे सांगण्यात येते. त्यावेळी शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला होता असे समजते.
काही दिवसांपूर्वी ज्या प्रमाणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणे कृषिभूषण पाटील यांनी टाळले होते, त्याच प्रमाणे सुप्रिया सुळे यांची देखील भेट साहेबराव पाटील यांनी घेतली नव्हती. मग आता सरळ मुंबई गाठत उमेदवारीची इच्छा व्यक्त करणे याला काय म्हणावे ?
दाल में कुछ काला हैं !
